काळ बदलत आहे…!
अलीकडे माणसं होतायेत निकामी भेसूर चेहरे अडकताहेत तंत्रज्ञानाच्या महाकाय जाळ्यात… गतिमान होणाऱ्या काळात धर्मांधतेच्या वाळवंटात पाय रुतून पडलेत.. ऑक्सिजन झालाय गढूळ! हवेतील समानतेचा ओलावा होतोय जहरी.. मेंदू झोपलेत, डोळे बंद आहेत ही प्रतिकृती होऊन बसलीय शत्रू सारं अगदी चिडीचूप फक्त आदेश घेणे…पुढे जाणे… हे हात पडलेत गळून सौंदर्यमुद्रा होतेय अंधूक…. धूसर गर्भबीजांवर होतंय अतिक्रमण माणूस …